Wednesday, August 18, 2010

हर्षित अभिराज यांच्या गीतांच्या अल्बमचे प्रकाशन


दूरच्या रानात या कविवर्य ना. धो. महानोर यांच्या कवितेला संगितबद्ध करून प्रसिद्धिच्या झोतात आलेले संगीतकार, गायक, चित्रपट निर्माते हर्षित अभिराज यांच्या माझी मुलगी या नव्या गीतांचा अल्बम या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रकाशित होणार आहे.

३० ऑगस्ट २०१० रोजी कोथरूड, पुणे येथे खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या ह्स्ते या अल्बमचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी ना. धो. महानोर हे असणार आहेत. या कार्यक्रमात माझी मुलगी व दूरच्या रानात या दोन्ही अल्बममधील गीतांचे नृत्य व संगीतमय सादरीकरण होणार आहे, व त्यात हर्षित अभिराज, वैशाली माडे, ऎश्वर्या शिर्के आणि गौरी कुलकर्णी सहभागी होणार आहेत.

माझी मुलगी या अल्बमध्ये एकूण आठ गीते असून ती ना. धो. महानोर, शांता शेळके, प्रदीप निफाडकर, इलाही जमादार यांनी लिहिली आहेत व हर्षित अभिराज, उत्तरा केळकर, वैशाली माडे यांनी गायली आहेत. हा अल्बम सुमीत कॅसेट्सची निर्मिती आहे.

हर्षित अभिराज यांनी यापूर्वी दूरच्या रानात केळीच्या बनात, निशिगंध, गाता गाता शिकू पुढे इत्यादी मराठी गीतांच्या दहा अल्बमना व पाच मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. निशिगंध या अल्बमचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील गीते प्रसिद्ध गायक डॉ. एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी गायलेली आहेत व ही त्यांची मराठीतील पहिलीच गीते आहेत. दूरच्या रानात केळीच्या बनात हे गीत आत्तापर्यंत मोबाईल रिंग टोनच्या माध्यमातून १,२५,०००हून अधिकवेळा डाऊनलोड झाले आहे.

या कार्यक्रमास मराठी गीत-संगीताच्या रसिकांना सहर्ष आमंत्रित करण्यात येत आहे.

कार्यक्रमाची वेळ: संध्याकाळी ५.३० वाजता
कार्यक्रमाचे ठिकाण: बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, जोग शाळेजवळ, कोथरूड, पुणे

विनामूल्य प्रवेशपत्रिकांसाठी सभागृहाववर दुपारी ४.३० नंतर संपर्क साधावा:
मकरंद: ९९२ २१८ २५०५, ९०९ ६२६ ३८२९
श्रीनिवास: ९८५ ०५४ ३३३८

Harshit Abhiraj at Facebook: http://www.facebook.com/people/Harsshit-Abhiraj/1680308117
Harshit Abhiraj at Orkut:
http://www.orkut.co.in/Main#Profile?uid=5016358641734507723
Website: http://www.harsshitabhiraj.com/